युनायटेड वे मुंबईच्या वतीने पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप 

युनायटेड वे मुंबईच्या वतीने पत्रकारांना अन्नधान्य किट वाटप 

कल्याण (प्रतिनिधी) : युनायटेड वे मुंबई या सेवाभावी संस्थेने विविध क्षेत्रातील पाच ते सहा कॉर्पोरेट कंपन्यांच्या मदतीने कोरोनाच्या प्रादुर्भावात सामाजिक भान राखून कल्याणमधील पत्रकारांना अन्नधान्याची मदत करण्यात केली. इतर गरजू व गोरगरीब, मध्यमवर्गीयांनाही संस्थेच्या  वतीने अन्नधान्याच्या किटची मदत करण्यात आली.

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आदी शहरातील विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या गरजूंना व गोर गरीब, मध्यमवर्गीयांना अशीच महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू असलेल्या अन्न धान्याचे किटची मदत करण्यात आली. युनायटेड वे या सेवाभावी संस्थेचे डायरेक्टर अजय गोवले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनश्री मंत्री व रवींद्र आरवेल यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकारी मोनिका गुरसिंघानी यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षात कल्याणमधील विविध वृत्तपत्रातील सुमारे ५२ पत्रकारांना संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. दरम्यान सामाजिक बांधिलकी बाळगून कोरोना महामारीत केलेल्या मदती बद्दल कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश तांबे आणि इतर सर्व पत्रकारांनी संस्थेचे आभार मानले आहेत.