नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या वतीने गरजूंना अन्नधान्य वाटप

नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या वतीने गरजूंना अन्नधान्य वाटप

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. अशा समयी गरीब नागरिकांचे हाल होत असल्याने आपल्या परिसरातील नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी प्रभाग क्र.४ च्या नगरसेविका स्नेहा आंब्रे व समाजसेवक रमेश आंब्रे यांच्या पुढाकाराने नवयुग मित्र मंडळाच्या वतीने कृष्णानगर, नौशिबाई कंपाऊंड, भवानीनगर, धर्मवीरनगर, नळपाडा, गांधीनगर येथील विभागातील नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

सदर उपक्रमासाठी मानपाडा पोलिस ठाण्याचे मोठे सहकार्य लाभल्याचे यावेळी गर्दी न होऊ न देता सोंशल डीस्टंस अथवा घरपोच सेवा करुन संपूर्ण नियमांचे पालन करून सदर धान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्थानिक नागरिकांना अन्नधान्य वाटप व रोजदारीवर काम करणारे नागरिकांना जेवणाचीही सोय  करण्यात आली आहे. परराज्यात घरची पायी वाट धरलेले मजुरांना सुद्धा जेवणाची व पाण्याची सोय मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. सदर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा सुरुच ठेवणार असल्याचे सांगत समाजसेवक रमेश आंब्रे यांनी सर्व नागरिकांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.