अदिती तटकरे यांच्या हस्ते फिरत्या विक्री केंद्राचे वितरण

अदिती तटकरे यांच्या हस्ते फिरत्या विक्री केंद्राचे वितरण

रोहा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत रोहा येथे सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने लाभार्थ्यांना फिरत्या विक्री केंद्राचे वितरण रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते नुकातेच करण्यात आले. 

यावेळी रोहा तालुकाध्यक्ष विनोद पासलकर, विजय मोरे, उपनगराध्यक्षा रिदवाना शेटे, गटनेते महेंद्र गुजर, शहराध्यक्ष अमित उकडे, नगरसेवक महेश कोल्हटकर, समीर सकपाळ, आफरीन रोगे, मयूर पायगुडे, सचिन चाळके, संतोष पवार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी तटकरे आपल्या भाषणात म्हणाल्या की, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरजू लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या उद्योग विभागामार्फत या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. युवक-युवतींना स्वयंपुर्ण बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प उभे राहण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.