केडीएमसीच्या रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांना पीपीई गाऊनचे वाटप

केडीएमसीच्या रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांना पीपीई गाऊनचे वाटप

कल्याण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी प्रणित केमिस्ट ड्रगिस्ट फार्मासिस्ट डॉक्टर्स, स्टुडंट्स फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील १५० डॉक्टरांना पीपीई गाऊनचे वाटप केले. कोरोना विषाणूच्या विरोधात लढताना डॉक्टरांच्या जीविताला धोका असतो, त्यासाठी काळजी घेण्याच्या अनुषंगाने माजी आमदार नरेंद्र पवार यांनी फाउंडेशनच्या वतीने केडीएमसीच्या रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टरांना नुकतेच या गाऊनचे वाटप करण्यात आले. 

कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढत आहेत. कल्याण शहरातही काही रुग्ण आहेत. लॉकडाऊन असल्याने नागरिक घराच्या बाहेर पडत नाहीत, मात्र डॉक्टर व वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्ती महत्वाची भूमिका बजावत आहेत. यासाठी पुढाकार घेत रुक्मिणीबाई रुग्णालय, मेडिहोप्स रुग्णालय, प्लस रुग्णालय, मीरा रुग्णालयासह कल्याण पश्चिममधील आदी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना सुरक्षा कवच म्हणून या पीपीई गाऊन पुरवण्यात आल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. याव्यतिरिक्त थेट कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्याना सर्वोतोपरी मदत करणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेले पूर्ण पीपीई किटही लवकरच देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी फाऊंडेशनचे सचिव तुषार मोरे, रवी गुप्ता, डॉ. पोटदुखे, डॉ. गंगान डॉ. अभिजीत ठाकूर, डॉ. वंदन महाजन, डॉ. प्रणव कुलकर्णी, डॉ. पराग मिसार, डॉ. चेतन वैद्य, डॉ. जयेश राठोड, डॉ. रितेश शिंदे, डॉ. प्रेरणा सोनवणे आदी उपस्थित होते.