कल्याण शहरातील तृतीयपंथीयांना राशनचे वाटप

कल्याण शहरातील तृतीयपंथीयांना राशनचे वाटप

कल्याण (प्रतिनिधी) : कोविड संकटाचा सामना सर्वच समाजघटक करत आहेत समाजातील वंचित घटकांना यांचा अधिकच फटका बसलेला आहे. अशातच कल्याण शहरातील सकल आदिवासी संस्थेच्या वतीने तब्बल १०० तृतीयपंथीयांना राशनचे वाटप करण्यात आले आहे. या वाटपासाठी टीम परिवर्तनच्या अनिकेत बारापात्रे, भुषण राजेशिर्के आणि अविनाश पाटील या युवकांचे मोलाची मदत मिळाली तर सुचिता बारापात्रे, योगिनी कोसराबे, संगीता निनावे, कांता आष्टीकर यांनी संपूर्ण वाटप कामांचे नियोजन केले.

प्रत्येक राशनकिटमध्ये तांदुळ, पीठ, डाळ, तेल, साखर, मीठ, साबण असे साहित्य देण्यात आले. सकल आदिवासी संस्था वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते सध्याची गरज लक्षांत घेता संस्थेच्या वतीने राशनकिट वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले होते. अनेक समाजघटकांसारखाच तृतीयपंथी समाज कायमच वंचित आणि दुर्लक्षित राहत असतात त्यामुळे आपल्या परीने त्यांना छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न सकल आदिवासी संस्थेच्या माध्यमाने करण्यात आला आहे. गोविंदवाडी, शहाड आणि आंबिवली परिसरात हे वाटप करण्यात आले.