पांडुरंग प्रतिष्ठानतर्फे ज्ञानसाधना विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप

पांडुरंग प्रतिष्ठानतर्फे ज्ञानसाधना विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप

मुरबाड (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते तथा पांडुरंग प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. धिरेश हरड यांनी शिक्षण घेतलेल्या आपल्या मुरबाड येथील ज्ञानसाधना विद्यालयातील नववी आणि दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करीत त्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात दिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे, गावाचे नाव उज्वल केले पाहिजे यासाठी त्यांना शिक्षणासाठी सहाय्य करण्याचा आपला प्रयत्न असल्याची भूमिका डॉ. हरड यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

डॉ. धिरेश हरड यांनी मुरबाड तालुक्यातील माजगाव येथील ज्ञानसाधना विद्यालयातून प्राथमिक शिक्षण घेतले होते. पुढे नोकरीला लागल्या नंतरही हरड हे आपल्या शाळेला विसरले नाहीत. त्यांनी शाळेतील इयत्ता ९ ते १० वीच्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची भूमिका घेत त्यांना शालेय पुस्तकांचे नुकतेच वाटप केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ विशे, सहशिक्षक श्रीमती शलाका घागस, अमोल सासे, दिनेश पवार, चंद्रकांत वाघेरे तसेच पांडुरंग प्रतिष्ठानचे संरक्षण विभाग प्रमुख मेजर महेंद्र उबाळे हे याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. हरड यांनी आपण आजोबा कै. शंकर पांगो शिंदे आणि वडील पांडुरंग हरड (गुरुजी) यांच्याकडून सामाजिक कार्याची प्रेरणा घेतल्याचे आवर्जून सांगितले. तसेच त्यांचे माजी शिक्षक चंद्रकांत पवार, रुपचंद झुंजाराव, भगवान देसले, दिपक पष्टे, शिरीष पष्टे याचे तोड भरुन कौतुक केले व पित्रृपक्षानिमित्त आपल्या सर्व दिवंगत  पुर्वजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मुळचे मुरबाड तालुक्यातील असलेले डॉ. हरड हे कामानिमित्त कल्याण येथे स्थायिक झाले आहेत. परतू लहानपणापासून सामाजिक कार्याची असलेली आवड जोपासत वेळोवेळी समाजातील गरीब व गरजू समाजघटकांना मदतीचा हात ते पुढे करीत आले आहेत. धीरेश कुटुंबीय हे नोकरीनिमित्त कल्याण शहरात स्थायिक झाले आहेत. ते मुळचे लगतच्या मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील असून त्यांचे वडिल पांडुरंग हेमा हरड देखील सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत असल्याने पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेकडो नववधुंचे कन्यादान केले आहे. 

धिरेश यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविला असून त्यांनीही शेकडो नववधुंचे कन्यादान केले आहे. नववधूला संसारोपयोगी भांडीकुंडी व इतर साहित्य ते स्वखर्चाने देतात. त्यांनी कल्याण, शहापूर व मुरबाड तालूक्यातील मुलींचे विवाहात कन्यादान करीत एक आगळीवेगळी समाजसेवा चालवली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने शहरातील भुकेल्यांना अन्नदान, विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत, मुलांसाठी गायन-नृत्याच्या स्पर्धांचे आयोजन, गरजू शेकडो महिला-युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण आदी माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक कार्य अविरत सुरु ठेवले आहे. आपल्या सामाजिक कामात  मर्गदर्शक किसान बोदरे, अतुल माळी, अॅॅड. धनंजय जोगदंड, राजेश गायकवाड़, विठ्ठल जवक, वसीम शेख, प्रकाश भीसे, ईजाज शेख, तसेच त्यांचे मोठे ब॔धु आप्पा महाराज, आई विमल हरड़, भगिनी संगीता पष्टे, पत्नी दिक्षीता हरड,  मुली कु. दिव्या आणि कु. अंकिता यांचेही सहकार्य मिळत असल्याचे ते आवर्जून सांगतात.