पांडुरंग प्रतिष्ठानकडून गरजूंना धान्य व मास्कचे वाटप 

पांडुरंग प्रतिष्ठानकडून गरजूंना धान्य व मास्कचे वाटप 

शहापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात शहापूर तालुक्यातील अनेक गावांतील शेकडो गरीब व गरजू कुटुंबांना पांडुरंग प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य व मास्कचे वाटप करण्यात येत आहे. 

शहापूर तालुक्यातील अनेक गावांमधील गरजू गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नधान्याची आवश्यकता असल्याची माहिती मिळताच पांडुरंग प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थाच्या वतीने कार्यकुशल जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ पष्टे, कार्यसम्राट समाजसेवक धिरेश पांडुरंग हरड़ यांच्या माध्यमातून शहापुर तालुक्यातील  गरजू  कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूसह अन्नधान्याचे गेल्या अनेक दिवसांपासून वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मास्कचे देखील मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी मेजर शरद हरड़, निलम शरद  हरड़, समाजसेवीका  विजया पष्टे, संगीता पष्टे, युवा समाजसेवक यश पष्टे, सुरेश हरड़ यांनी सहकार्य मिळत आहे.

पांडुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत सुमारे ७०० कुटुंबांना अनधान्य तर ५००० मास्कचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरड यांनी दिली आहे. यापुढेही ज्यांना मदतीची गरज असेल त्यांना प्रतिष्ठान निश्चितच मदत करेल असेही त्यांनी आश्वासन दिले.