चिपळूण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापणार

चिपळूण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापणार

मुंबई  (प्रतिनिधी) :
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळूण येथे करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या न्यायालयासाठी एकूण २५ पदांच्या निर्मितीलाही मंजुरी देण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आवश्यक असलेले निकष पूर्ण होत असल्याने उच्च न्यायालयाने येथे न्यायालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी एकूण १ कोटी १५ लाख ४३ हजार १४० रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.