ठाण्यात रंगला दिव्यांग कला महोत्सव

ठाण्यात रंगला दिव्यांग कला महोत्सव

ठाणे (प्रतिनिधी) : 
आपण सर्वसामान्य मुलांप्रमाणे नसलो तरी आपल्यातील व्यंगत्वावर मात करुन अंगभूत कला सामान्यांप्रमाणे सादर करु शकतो याची प्रचिती रंगायतनमध्ये अनुभवताना डोळ्याचे पारणे ‍फिटत होते. ‍निमित्त होते ठाणे महानगरपालिका आयोजित दिव्यांग कल्याणकारी योजनेतंर्गत सादर झालेल्या दोन दिवसीय ठाणे महापौर चषक कला स्पर्धांचे. महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून प्रथमच भव्यदिव्य स्वरुपात खास दिव्यांगांसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 

सदर ठाणे महापौर चषक कलास्पर्धांचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती जयश्री डेव्हीड, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी, नगरसेविका मालती पाटील, परिवहन सदस्य राजू महाडिक, समाजविकास ‍विभागाच्या उपायुकत वर्षा दिक्षीत, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे आदी उपस्थीत होते.

दोन दिवसीय क्रिडा महोत्सव धर्मवीर मैदान येथे नुकताच पार पडला. या महोत्सवात विविध्‍  स्पर्धा झाल्या. या स्पर्धांनाही दिव्‌यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच गडकरी रंगायतनमध्ये नृत्य व गायन स्पर्धा पार पडली. ठाणे शहरातील तब्बल १९ शाळा व संस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेवून या महोत्सवात आपली कला सादर केली. हिंदी, मराठी भावगीते, भक्तीगीते सादर करुन या विद्यार्थ्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

या महोत्सवातील गायन स्पर्धेत  प्रथम क्रमांक पल्लवी पाटील, दवितीय क्रमांक रिध्दी कवठणकर, तृतीय क्रमांक अथर्व बांदल यांनी पटकाविला. एकेरी नृत्य स्पर्धेत  सेंट जॉन शाळेच्या दिव्या नायर हिने प्रथम, कमलिनी कर्णबधीर विद्यालयाच्या अमित सिंग याने दवितीय तर जान्हवी सालसकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला. समूह नृत्य स्पर्धेत आम्ही ठाकर ठाकर या गाण्यावर नृत्य सादर करणाऱ्या जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.  माऊली माऊली  या गाण्यावर नृत्य सादर करणाऱ्या दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी दवितीय तर बेकसूर या गाण्यावर नृत्य सादर करणाऱ्या होली क्रॉस शाळेच्या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांक पटकाविला.‍ स्पर्धेसाठी  परीक्षक म्हणून अनिरुध्द जोशी, सुषमा रेगे, वीणा टिळक यांनी पाहिले.