डोंबिवली: शास्त्रीनगर येथील विकास कामांचे आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ 

डोंबिवली: शास्त्रीनगर येथील विकास कामांचे आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ 

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर प्रभागातील वाशी बस स्थानक ते गणपती प्लाझा या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्याच्या कामासह अन्य विकास कामांचे स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आले.

यावेळी प्रभाग क्र. ६२, शास्त्रीनगरच्या माजी नगरसेविका वृषाली रणजित जोशी, माजी नगरसेवक रणजित जोशी यांच्या प्रयत्नातून सदर विकास कामे मार्गी लागली. आ. चव्हाण यांच्या हस्ते वाशी बस स्थानक ते गणपती प्लाझा या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करणे, तसेच ओपन जिमच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी आ. चव्हाण यांनी रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण केल्यास ते चांगले टिकतात अशी भाजपची भूमिका असल्याचे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपले मनोगत व्यक करताना माजी नगरसेवक रणजित जोशी म्हणाले की, दोन महत्वाच्या विकास कामांचा आज शुभारंभ झाला आहे. वाशी बस स्थानक ते गणपती प्लाझा या रस्त्याचे काम गेल्या ५० वर्षात झाले नव्हते. स्थानिक नगरसेविका वृषाली जोशी यांनी पाठपुरावा करून हे काम मार्गी लावल्याने या भागातील हजारो नागरिकांचा त्रास दूर होणार आहे.