डोंबिवली शिवसेसेनेतर्फे ६० अंध व्यक्तींना लसीकरण आणि शिधासाहित्याची मदत

डोंबिवली शिवसेसेनेतर्फे ६० अंध व्यक्तींना लसीकरण आणि शिधासाहित्याची मदत

डोंबिवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ सनसिटी आणि शिवसेनेचे डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लसीकरण अंधांची व लसीकरण सगळ्यांची’ असा संदेश देत सोमवारी सकाळी ६० अंध व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यावेळी त्यांना शिधासाहीत्य (रेशनिंग किट) देखील देण्यात आले.

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर शिवमंदिर येथील ज्ञानेश्वर हिंदी हायस्कुलच्या लसीकरण केंद्रात सोमवारी वांगणी, कर्जत, कल्याण, बदलापूर व डोंबिवली, येथील अंध व अपंग अशा सुमारे ६० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. रोटरी क्लब सनसिटी डोंबिवली आणि डोंबिवली शहर शाखेमार्फत सोमवारी दुपारी अंध-अपंगांकरीता विशेष लसीकरण शिबिर ठेवण्यात आले होते. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तीला लस मिळायलाच हवी ह्याच उद्देशाने ही लसीकरण मोहीम घेण्यात आली. शिवसेना नेहमी समाजकार्य करते असते, त्याचाच  एक भाग म्हणून अंध-अपंगांसाठी कोणतीही रांगा व गर्दी न करता त्यांच्यासाठी एका खोलीत विशेष व्यवस्था करून त्यांचे लसीकरण करून घेतल्याचे शहरप्रमुख मोरे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. यावेळी महापालिकेचे वैधकीय अधिकारी डॉ. अर्ध्वयू गौडकर, उपअभियंता रोहिणी लोकरे, रोटरीचे निशांत व्यास, लक्ष्मी शर्मा, विभाग प्रमुख किरण पाटील, अनिल माळी, सागर जेधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.