डोंबिवली येथील डॉ. प्रियांका रोशन पाटील एम.डी. परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण 

डोंबिवली येथील डॉ. प्रियांका रोशन पाटील एम.डी. परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण 

डोंबिवली (प्रतिनिधी) :
डोंबिवली येथील डॉ. प्रियांका रोशन पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी. (जनरल मेडिसिन) परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत धवल यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली परिसरातील आगरी समाजातून वैद्यकीय क्षेत्रात एवढे उच्च यश मिळविणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये प्रियांका पाटील यांनी आपले नाव कोरले आहे. 

दहावी-बारावी नंतर प्रियांका यांनी डी. वाय. पाटील कॉलेज येथून उच्च श्रेणीत एमबीबीएसचा टप्पा पार केला. मध्यमवर्गीय आगरी कुटुंबात जन्मलेल्या प्रियांका यांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च यश प्राप्त करणे ही घटना तशी विरळच म्हणावी लागेल. आपले ध्येय सध्या करण्यासाठी त्यांनी जिद्दीने अपार मेहनत घेत वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मोठे यश संपादन केले आहे. मेडिकल जर्नलमध्ये त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, प्राध्यापकवर्ग, तसेच महाविद्यालयाला देत प्रियांका यांनी यापुढे रुग्णसेवा करून संशोधन कार्य सुरु ठेवण्याची इच्छा बाळगली आहे. डोंबिवली येथील माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या त्या स्नुषा आहेत.

प्रियांका पाटील यांच्या यशाबद्दल नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनलचे ज्युडीशियल सदस्य मदन गोसावी, डोंबिवली येथील एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिरोडकर, महंत ह.भ.प. बाळकृष्ण महाराज यांच्यासह असंख्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून आगरी समाजासह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.