पोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले नवजात अर्भकाचे अन् मातेचे प्राण

पोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले नवजात अर्भकाचे अन् मातेचे प्राण

ठाणे (प्रतिनिधी)- रस्त्यावर राहणार्‍या एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर नाळ न तोडल्याने ही महिला वेदनेने तडफडत असतानाच गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळाली असता त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून बाळंत महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे.

गांधी उद्यानानजीकच्या सॅटीस ब्रिजखाली दत्ता गुंजाळकर आपल्या पत्नीसह राहतात. त्यांची पत्नी रेखा (२५) ही गर्भवती होती. गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ती प्रसूत झाली. मात्र नाळ कापलेली नसल्याने नवजात मुलगी आणि रेखा यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. याची माहिती  बिट मार्शल-2 चे कर्मचारी तरे, शेळके व पांढरे यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळ गाठले. तिथे जाऊन त्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन बाळंत महिला आणि मुलीला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तिथे या महिलेवर उपचार करुन नाळ कापली. सध्या या मुलीची आणि महिलेची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे दिलीप माने यांनी दिली.