बिर्ला महाविद्यालयाची म्हसकळ गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

बिर्ला महाविद्यालयाची म्हसकळ गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

कल्याण (प्रतिनिधी) : कोरोना जरी कमी होत असला तरी देशाची, समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. शाळा- कॉलेजे जरी सूरु झाले असले तरी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमतरता व गरज भासत आहे. त्या अनुषंगाने बी.के. बिर्ला महाविद्यालयाच्या सौंजन्याने व बी.के. बिर्ला कॉलेज एनएसएस युनिटतर्फे टिटवाळा येथील म्हसकळ या गावात तसेच लगतच्या अंकुर अनाथ आश्रमात मोफत शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

एक वेगळी ऊर्जा व एक वेगळा संदेश बी.के. बिर्ला कॉलेज एनएसएस युनिटतर्फे गावातील मुलांना देण्यात आला. एनएसएस युनिटच्या स्वयंमसेवकांनी समाज जागृती केली, गावातील मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. एक प्रकारे जनजागृती घडवून आणत एक आगळा वेगळा उपक्रम महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटतर्फे राबवण्यात आला. 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये बी.के. बिर्ला कॉलेजचे शैक्षणिक संचालक नरेश चंद्र, महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश पाटील, वाणिज्य शाखेचे उप-प्राध्यापक डॉ. बिपीनचंद्र वाडेकर, त्याच प्रमाणे महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदेश जायभाये, डॉ. सोनाली पाटील, कृष्णा घोडे व बिर्ला महाविद्यालय एनएसएस युनिटच्या स्वयंसेवकांनी मोलाची कामगिरी बजावली.