युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘एक दिन का न्याय’ उपक्रम

युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘एक दिन का न्याय’ उपक्रम

कल्याण (प्रतिनिधी) : भारतीय संगणक क्रांतीचे जनक व भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस तर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे व प्रदेश महासचिव ब्रीजकिशोर दत्त यांचा आदेशाने आज एक दिन का न्याय हा कार्यक्रम घेण्यात आला. कल्याण डोंबिवली जिल्हा युवक कांग्रेस अध्यक्ष मनीष देसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण विधानसभा मतदार संघात हा कार्यक्रम राबविण्यात आला.

२०१९ च्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा अजेंडा होता की वार्षिंक उत्पन्न १,४४,००० पेक्षा कमी असलेल्या सर्व कुटंबाना कांग्रेस सरकार कडून दरमहा ६ हजार रुपये (२०० रु प्रतीदीन) थेट बैंक खात्यात जमा होतील आशी योजना होती. त्यासाठी आज २०० रु म्हणजे न्याय योजनेचा एक दिवसाचा अनुभव आहे. जिल्हायुवक कांग्रेसच्या  वतीने २००रु देऊन लॉकडाऊन काळात गरजू लोकांना मदत करण्यात आली. कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या चारही विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी १११ अशा ४४४ गरजू नागरिकांना हि मदत देण्यात आली. तसेच प्रदेश महासचिव ब्रीजकिशोर दत्त यांच्यावतीने ५० गरजूंना हि मदत करण्यात आली  

या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष मनीष देसले, अनुसूचित जाती व जमाती जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र आढाव, ग्रामीण विधानसभा आध्यक्ष प्रमोद पाटील, महासचीव जाफ़र खाटीक, महासचीव गायत्री सेन, ग्रामीण सचीव इब्राहिम खाटीक ग्रामीण उपआध्यक्ष नागेश बोराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.