बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार

बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार

कल्याण (प्रतिनिधी) : बीएसएनएलचे खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ कोकण विभागीय बीएसएनएल  मुख्यालयाबाहेर बीएसएनएलमधील कार्यरत असलेल्या तीनही कामगार संघटनांनी एकत्र येत खाजगीकरण रद्द करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारात निदर्शने करीत आंदोलन केले.

कल्याण पश्चिम भागातील काळा तलाव परिसरात ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधदुर्ग या कोकणातीला जिल्ह्याचे  कोकण विभागीय बीएसएनएल मुख्यालय आहे. आज या कार्यलयाच्या प्रवेश द्वारावर बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन, ऑल इंडिया बीएसएनएल डिओटी पेंशननर्स असोशियन, बीएसएनएल कॅज्युअल वर्कर फेडरेशन, ह्या तिन्ही संघटना टेलिकॉम कल्याण जिल्हा सचिव संतोष सोनी व वसंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली येत अंदोलन केले. यावेळी आंदोलनात कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारत १६ विविध मागण्यासाठी हे अंदोलन केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.