शमशेर खान यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

शमशेर खान यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

डोंबिवली (अक्षय शिंदे) : कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग आणि कल्याण डोंबिवली शहर जिल्हा उपाध्यक्ष शमशेर खान यांच्या संयुक्त विद्यमाने तरुण मुले आणि मुलींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

कोरोना काळात देशातील ७५ टक्के नागरिक बेरोजगार झाले असल्याचे चित्र डोळ्यासमोर होते. आता कोरोनाचा वेग स्थिरावत असताना बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेता शमशेर खान यांच्यातर्फे नामांकित अशा ऑनलाईन खरेदीविक्री होणाऱ्या फ्लिपकार्ट तसेच इतर कंपन्यांमध्ये २,५०० विविध पदांसाठी बेरोजगारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी बेरोजगारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता फ्लिपकार्ट कंपनीमध्ये डायरेक्ट जॉइनिंग करून देण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी संतोष केणे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्या उपस्थितीत मुलामुलींना कंपनीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. 

बेरोजगारीमुक्त भारत करण्यासाठी काँग्रेस नेहमी प्रयत्नशील असते. नागरिकांना रोजगार कसा मिळवून देता येईल यावर शमशेर खान नेहमी प्रयत्न करत असतात. या मेळाव्यात ५ वी ते पदवीधर विद्यार्थ्यासाठी विविध श्रेणीमध्ये पद नियुक्ती करू देण्यात आली. ठाकुर्ली परिसरात आम्ही विविध कंपन्यांमार्फत नागरिकांना रोजगार देऊ जेणेकरून शहरातील नागरिक बेरोजगार राहणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शमशेर खान यांनी केले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, वरिष्ठ नेते रवी पाटील, एकनाथ म्हात्रे, नंदू म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष शिफा महशर पावले खटखटे, रोशन खान, नर्गीस खान, रेहाना खान, शाहिद खान आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.