मिलिंदनगर-घोलपनगरच्या क्लस्टर विकासासाठी कृती समिती स्थापन

मिलिंदनगर-घोलपनगरच्या क्लस्टर विकासासाठी कृती समिती स्थापन

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात क्लस्टर योजनेला मंजुरी मिळण्याची मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक १६, मिलिंदनगर-घोलपनगरमधील नागरिकांनी एकत्र येत पुनर्विकास कृती समिती स्थापन केली आहे.

मिलिंदनगर-घोलपनगरमध्ये बहुतांश बैठ्या चाळींचा जुना परिसर आहे. येथे भवानी नगर, समन्वय समिती व उर्वरित बैठया चाळी भागात पुरामुळे पाणी शिरून येथील रहिवाशांना कित्येक वर्षे अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, प्रचंड हानी सहन करावी लागते. घोलपनगर प्रभागातील जुन्या पूरग्रस्त भागाला प्राथमिकता देऊन क्लस्टर योजना पुनर्विकासात स्थान द्यावे व या भागाचा प्राधान्य क्रमाने विकास व्हावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी सर्वसमावेशक पुनर्विकास कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. 

प्रमुख सल्लागार आर्किटेक्ट गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या पहिल्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष- भरत गायकवाड, अध्यक्ष- सुनील उतेकर, सचिव- सतीश मोरे, खजिनदार- नितीन गायकवाड, उपाध्यक्ष- विशाल कांबळे, पितांबर शिंदे, सहसचिव- पंकज डोईफोडे, नरेश चिपळूणकर, कायदेशीर सल्लागार- अॅड. सुशांत म्हात्रे, सल्लागार- श्रीकांत प्रभू, मधुकर सुर्वे, नामदेव जाधव, सुधाकर गायकवाड, दिलीप गायकवाड, विनोद शिरवाडकर, राकेश मोरे, संतोष कामेरकर, प्रशांत मोरे, सदस्य- भागवत निकाळे, शंकर जाधव, एकनाथ लब्दे, अनिल गायकवाड, अरुण राऊळ, जगन्नाथ लाटेकर, विजय चव्हाण, प्रकाश परब, केतन डोडामनी, शेखर आटोळे, गणेश घाग, सुरज सपालिगा, सुरेश अहिरे, सचिन शेळके, विनोद पाटील, गणेश जाधव, अमीर आफंडकर, विलास गायकवाड, हर्षल वासनिक.