भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भुमीपुत्र पक्षाची स्थापना

भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भुमीपुत्र पक्षाची स्थापना

कल्याण (प्रतिनिधी) : भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात राष्ट्रीय स्तरावर भूमिपुत्र पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वतीने विद्यमान व या पूर्वीच्या सर्वच सरकारांकडून भूमिपुत्रांवर झालेला अन्याय व त्यांच्या विकासाबद्दल नेहमी अवहेलना केली जात आली आहे. याकरिता भारतीय राज्य घटनेच्या नियमानुसार देशात राहणाऱ्या भुमिपुत्रांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी दिली. कल्याण पूर्वेतील तिसाई हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी मोटे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी, आग्री, कोळी, आदिवासी, कातकरी, हातमजूर, कष्टकरी-कामगार, बहुजनवर्ग, शिक्षक-विदयार्थी, पत्रकार व सामान्य माणसांना न्याय मिळण्यासाठी ‘भूमिपुत्र पार्टीची’ स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी  सांगितले. पक्षाच्या विस्ताराची घोषणा लवकरच करण्यात येईल. महापालिका निवडणुकांसह आगामी सर्वच निवडणूका भूमिपुत्र पार्टी लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी बाळाराम पाटील, माया पाटील, जितेंद्र जाधव, शरद पाटील, प्रकाश पाटील, विनोद भोईर, शरद म्हात्रे, शंकर गायकवाड आदी उपस्थित होते.