प्रवासी कल्याणकारी संघाची स्थापना 

प्रवासी कल्याणकारी संघाची स्थापना 

आंबिवली (प्रतिनिधी) : कल्याण परिसरातील प्रवासी वर्गाला अनंत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कल्याण येथे प्रवासी कल्याणकारी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली असून कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोनकर यांची संघटनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

आंबिवली येथील विवेकानंद इन्स्टिट्यूटमध्ये संपन्न झालेल्या सभेत प्रवासी कल्याणकारी संघाची स्थापना करण्याचा निर्णय उपस्थित सदस्यांनी सर्वानुमते घेतला. यावेळी संघाची उर्वरित पदाधिकारी पुढील सभेत निवडण्याचे ठरविण्यात आले. पत्रकार प्रविण आंब्रे, अनिल रोकडे, विनोद ढोणे, राजेश यादव आदी प्रतिनिधी सभेला उपस्थित होते.