वंश कदम मुंबई महापौर योगासन स्पर्धेत प्रथम

वंश कदम मुंबई महापौर योगासन स्पर्धेत प्रथम

ठाणे (प्रतिनिधी) : कल्याण येथील रहिवासी वंश रमेश कदम याने मुंबई महापौर योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यंदा कोरोनाचा कहर असल्याने ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कल्याणच्या चिकनघर परिसरात राहणारा वंश महावीर जैन स्कूलमध्ये दुसर्‍या इयत्तेत शिकत आहे. त्याने यापूर्वी डोंबिवली येथे झालेल्या ठाणे योगा असोसिएशनच्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला होता. वंश योगासनासह मल्लखांबही खेळतो. यात त्याला रमेश कदम, संदीप डिक्कर यांचे मार्गदर्शन लाभत असते.