ठाण्यात पहिले स्मार्ट न्युजपेपर स्टॉल

ठाण्यात पहिले स्मार्ट न्युजपेपर स्टॉल

ठाणे (प्रतिनिधी) : 
ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे ‘स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूज पेपर स्टॉल’ या संकल्पनेवर बनवण्यात आलेल्या स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचे उदघाटन मोठ्या उत्साहात नुकतेच करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपलब्ध होते.

ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूज पेपर स्टॉल या संकल्पनेवर बनवण्यात आलेल्या स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचे उदघाटन आ. संजय केळकर व  जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जेवण डफळे, संजय पावशे, राजीव धावरे, अजय उतेकर, संतोष पाडावे, सिद्धेश चव्हाण असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, दिलीप चिंचोली, वैभव म्हात्रे, भरत कुथे, गणेश शेडगे यावेळी उपस्थित होते.

उन, पाऊस वारा यापासून वृत्तपत्र विक्रीत्याला संरक्षण मिळेल या हेतूने हे स्टॉल बनवण्यात आले आहे. या ठाणे महापालिकेने या स्टॉलला परवाना दिलेला आहे. आता या स्टॉलवर वृत्तपत्र विक्रेते जाहिराती स्वीकारतील आणि त्यातून त्यांना अधिक मोबदलाही मिळेल. यापुढे स्टॉल वरती कुरिअरचे पिकअप आणि ड्रॉप पॉईंट सुरू करण्याचे नियोजन आहे. वृत्तपत्र विक्रेते आता महिन्याची पेपरची बिले घेण्यासाठी ऑनलाईन मोबाईल ॲप्सचा सुद्धा वापर करणार आहेत आणि ऑनलाइन ट्रांजेक्शनचा वापर करतील, अशी माहितीही यावेळी दत्ता घाडगे यांनी दिली