रोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत

रोटरी क्लबतर्फे कल्याणमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत

कल्याण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरतर्फे कल्याण पूर्वेतील अशोकनगर व शनिंनगर येथील पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या पॅकेटचे नुकतेच वितरण करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी सातत्याने पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सखल भागातील रहिवाशांना जोरदार फटका बसला. त्यांचे मोठे नुकसान झाले. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली, त्यातच अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने असंख्य कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली. सर्व स्तरातून या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला जात आहे. रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरतर्फे कल्याण पूर्वेतील अशोकनगर व शनिंनगर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत त्यांना अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या पॅकेटचे वितरण करण्यात आले. 

यावेळी स्थानिक नगरसेवक राजाराम पावशे, रोटरी कल्याण पूर्वचे अध्यक्ष संदीप पवार, सेक्रेटरी देव कुमार, खजिनदार प्रेम कुमार, रोटरी कल्याण पूर्वचे समन्वयक संदीप चौधरी, माजी अध्यक्ष आशिष वाणी, रोट्रीयन ठाकूर देसाई, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, रोट्रीयन स्थानिक समाजसेवक रोट्रीयन बाळा बर्वे, रोट्रीयन सिद्धेश देवळेकर उपस्थित होते.