पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कल्याणच्या माजी नगरसेवकाने गाठली कर्नाटकची हद्द 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कल्याणच्या माजी नगरसेवकाने गाठली कर्नाटकची हद्द 

कल्याण (प्रतिनिधी) :
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कोकणात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी तेथील जनतेला ठिकठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातूनही प्रचंड प्रमाणात लोकांनी या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये कल्याणमधील माजी नगरसेवक विष्णू गायकवाड आणि त्यांच्या सहकारीही अग्रभागी असून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अन्नधान्य व जीवनोपयोगी साहित्य कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही पूरग्रस्त गावांमधील कुटुंबांपर्यंत पोहोचविले.

शासकिय मदत पोहोचण्याआधीच अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी पूरग्रस्त जिल्ह्यांकडे धाव घेतली. ठाणे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामधील गरजूंना केली जात आहे. कल्याण पूर्व येथील उद्योजक तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विष्णू गायकवाड यांनीही कल्याण पूर्वेतील नांदिवली कोळीवाडा येथील शिवसेना विभागप्रमुख रामदास ढोणे, भाल येथील समीर म्हात्रे, मलंगगड येथील सुरज पाटील, दिलीप गांगुर्डे,  ईलंगो स्वामी या सहकाऱ्यांसह अन्नधान्य, कपडे, चटई चादरी यासह इतर जीवनोपयोगी साहित्य घेऊन कोल्हापूर गाठले. 

कोल्हापुरपासुन ११३ किमी पुढे कर्नाटकच्या हद्दी जवळील चंदगढ तालुक्यांतील कुवाड, दुंडगे, राजगोळी, हडगले, चिंचणे या गावातील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप केले. स्थानिक सरपंच व ग्रामसेवक यांना घेऊन प्रत्यक्ष  पूरग्रस्त लोकांच्या घरी जाऊन मदत मदत पोहोचवली.  या कामात त्यांना चंदगड येथील शिवसेना विधानसभा क्षेत्र संघटक श्वेता गौरव नाईक यांचे सहकार्य लाभले. तसेच सांगली जिल्ह्यातील काही गावांमध्ये देखील त्यांनी जीवनोपयोगी साहित्याचे त्यांनी वाटप केले. यावेळी गायकवाड यांनी तेथील पूरग्रस्तांना आणखी मदत लागल्यास आपणास संपर्क करावा असे आवर्जून सांगितले.