ठाणे येथे भाजपाच्या वतीने दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत अँटीजन टेस्ट 

ठाणे येथे भाजपाच्या वतीने दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत अँटीजन टेस्ट 

ठाणे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी व नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या वतीने व्यापारी व दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत अँटीजन टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय जनता पार्टीच्या मागणीवरून ठाणे महापालिकेने सर्व दुकान उडण्यास परवनगी दिल्यावर कोरोनाचा वाढत संवर्ग लक्षात घेता नागरिकांची काळजी म्हणून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ व सबअर्बन डायगोनेस्टीक सेंटर यांच्या वतीने व नगरसेविका स्नेहा आंब्रे व भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील डॉ. काशिनाथ नाट्यगृह येथे नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या वाढदिवसानिमित्त व्यापारी व दुकानात काम करणारे कर्मचारी यांची मोफत अँटीजन टेस्ट शिबीर आयोजित केले होते. यावेळी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, ठामपा गटनेते नगरसेवक संजय वाघुले, राजेश सावंत, अश्विन शेट्टी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. दोन  दिवस आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून टेस्ट करू घेतली.