गुणदे गावातील शालेय विद्यार्थ्याना मोफत दफ्तरे

गुणदे गावातील शालेय विद्यार्थ्याना मोफत दफ्तरे

लोटे (प्रातिनिधी) : 
येथील गुणदे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्याना मोफत दफ्तरे देण्यात आली. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने या दफ्तरांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सुनिल मोरे, रविंद्र आंब्रे यांच्या प्रयत्नांने दोन टप्प्यात गुणदे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणदे शाळा न.१ गणवाळवाडी, तांबडवाडी, ढाकरवाडी, गोठलवाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद सदस्य सुनिल मोरे, रविंद्र आंब्रे, ए. बी. मोर्यी कंपनीचे पर्सोनेल मॅनेजर घाग, सुभाष आंब्रे, पोलीस पाटील पवार, गणवाळ शाळेतील शिक्षक पाटील, केंद्र शाळेतील शिक्षिकवर्ग, गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपनी ए. बी. मोर्यीच्या सौजन्याने ही दफ्तरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.