सुनिल वायले यांच्या प्रयत्नाने नागरिकांना मोफत लसीकरण 

सुनिल वायले यांच्या प्रयत्नाने नागरिकांना मोफत लसीकरण 

कल्याण (प्रतिनिधी) : माझे कुटुंब माझी जबाबदारी या सरकारच्या संकल्पनेतून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेविका शालिनी सुनिल वायले आणि सुनिल वायले यांच्या प्रयत्नाने वायलेनगर परिसरामध्ये नागरिकांना मोफत लसीकरण पोदार स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते . 

सध्याची परिस्थिती पाहता रेल्वे , मॉल अश्या अनेक ठिकाणी लसीकरणाचे डोस अनिवार्य ठरत आहेत . कोरोनाचे संकट अजूनही आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे जेणेकरून पुढील आयुष्यात कोरोनाची लागण होणार नाही, असे यावेळी सुनिल वायले म्हणाले. आयोजित शिबिरात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला. सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला वेळेवर लस उपलब्ध होत नाही यामध्ये नागरिकांचा वेळही खर्च होतो हे लक्षात घेता सुनिल वायले यांनी नागरिकांसाठी लसीकरण प्रभागात उपलब्ध करून दिले आहे.