छ. संभाजीराजे जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे फळवाटप

छ. संभाजीराजे जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे फळवाटप

पालघर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सवानिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे वाडा तालुक्यातील नांदणी येथे सोशल डीस्टन्सिंगचे पालन करीत लहान मुलांना फळ वाटप करण्यात आले.

कोविड-१९ आजाराच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने मुलांना फळे मिळत नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी गावातील लहान मुलांना आरोग्याला पोषक असे द्राक्ष फळांचे व बिस्कीटचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात मुलांना आरोग्याची माहिती ही देण्यात आली यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पालघर प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश पाटील, संजय होले, नवनित्यानंद सरस्वती बाबा, रुपेश कोशिंबे निवडक पदाधिकाऱ्यांनी सोशल डीस्टन्सिंगचे पालन करीत फळ व बिस्किटांचे वाटप केले.