शहाड कल्याण मार्बल असोसिएशनच्या अध्यक्षपदी गणेश कोट

शहाड कल्याण मार्बल असोसिएशनच्या अध्यक्षपदी गणेश कोट

कल्याण (प्रतिनिधी) : शहाड कल्याण मार्बल असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवसेना नगरसेवक गणेश श्रीपत कोट यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

शहाड येथील मोहोने रोडवर मार्बल व्यापाऱ्यांची दुकाने मोठ्या संख्येने आहेत. या व्यापाऱ्यांच्या शहाड कल्याण मार्बल असोसिएशन या संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी स्थानिक नगरसेवक गणेश श्रीपत कोट यांची नुकतीच निवड करण्यात आली. मार्बल व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही कोट यांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे. या निवडीबद्दल कोट यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.