डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवलीतील भोपर परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सुमारे ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आणखी ८ जणांचा शोध सुरू आहे. मुलीच्या प्रियकराने मुलीवर अत्याचार करीत त्याचा व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करीत आरोपींनी  तिच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर २९ जानेवारी २०२१ ते २२ सप्टेंबर २०२१ च्या दरम्यान डोंबिवली, बदलापुर, मुरबाड व रबाळे या परीसरात आरोपींनी वेळोवेळी पिडीत मुलीवर बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित करुन त्याचा व्हिडीओ काढुन, हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन, आपसांत संगनमत करुन मुलीची इच्छा नसतानाही तिच्यासोबत बळजबरीने वारंवार शारीरीक संबध प्रस्थापित केले. याबाबत मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये  पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परीमंडळ ३, कल्याण सचिन गुंजाळ यांनी लागलीच तपास चालु केला. परीमंडळ ३, कल्याण मधील इतर पोलीस ठाण्याचे तसेच मानपाडा पोलीस ठाण्याची एकंदर ०४ पोलीस पथके स्थापन करुन या गुन्हयातील आरोपींची पुर्ण नांवे व पत्ते माहिती नसतानाही गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद गुन्हयात एकदर २३ आरोपीत यांना गुन्हा दाखल होताच ४ तासात ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करुन त्यांना गुन्हयात अटक केली आहे.

तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या २३ जणांपैकी ०२ विधी संघर्षीत बालक यांचाही गुन्हयात सहभाग असल्याचे आढळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणुन पिडीत मुलीस न्याय देण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहोत. तसेच उर्वरीत १० आरोपींचा देखील पथकाकडुन शोध चालु असुन त्यांनाही या गुन्हयात लवकरात लवकर अटक करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालु आहेत.

या गुन्हयाच्या घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग जे.डी.मोरे, मानपाडा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी भेट दिली. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) सोनाली ढोले हया करीत आहेत.