आ. गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने कल्याण पूर्वेत शासकीय दाखल्यांचे वाटप

आ. गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने कल्याण पूर्वेत शासकीय दाखल्यांचे वाटप

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पूर्वेतील जेष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शासकीय दाखले तातडीने मिळावेत यासाठी कल्याण पूर्वचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शासकीय दाखल्यांचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

नागरिक व विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शासकीय दाखले वेळेत मिळावेत यासाठी आ. गणपत गायकवाड यांच्यावतीने दरवर्षी शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाही दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. शिंदे, आ. गायकवाड, आरपीआय (आ.) नेते दयाल बहादुरे, माजी महापौर रमेश जाधव, शिवसेनेचे कल्याण पूर्वचे उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, शरद पाटील, परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष म्हस्के, सदस्य संजय मोरे यांच्यासह सेना-भाजपचे अनेक आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सुमारे १७०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.