कोकण रहिवाशी मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न

कोकण रहिवाशी मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न

टिटवाळा (प्रतिनिधी) : येथील कोकण रहिवाशी मंडळाच्या वतीने महिला सदस्यांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन प्रथमेश हॉल येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेविका नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भोईर, आम आदमी पार्टीच्या अध्यक्षा वैष्णवी शिर्के, मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष यशवंत परब, उपाध्यक्ष मोहन कणेरी, सचिव राजेंद्र चव्हाण, खजिनदार सुनील कवडे आदी उपस्थित होते.

कोकण रहिवाशी मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष यशवंत परब, करुणा यशवंत परब, उपाध्यक्ष मोहन कणेरी मीनल कणेरी, ऋतूषा हिरलेकर सायली कदम यांच्या हस्ते करण्यात आले. काराक्रमाच्या प्रारंभी शहीद जवान, कोरोना महामारीमध्ये निधन पावलेल्या व्यक्ती आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी वैदही नांदगावकर, कोरोना योध्दा सुशिला म्हाके यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या सक्रीय कार्यकर्त्या सायली कदम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्य परब, सार्थक सावंत, सेजल घनकुटे, सिधी फणसेकर, साची ठाकूर, रिधी कुडतकर, वंश हिर्लेकर, ध्रुव मोरे, विघ्नेश सावंत या लहान मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य करून उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यांना बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव राजापकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी मीनल कणेरी, करुणा परब, ऋतुषा हिर्लेकर, अर्चना ठाकूर, सायली कदम, विजया पालांडे, वैष्णवी शिर्के, तसेच सुनील कवडे, सुनील महाडिक, नामदेव पुचुरले, प्रवीण टोले आदींनी परिश्रम घेतले.