शनिवारी ठाण्यात ‘हॅलोवीन भुतांची जत्रा’

शनिवारी ठाण्यात ‘हॅलोवीन भुतांची जत्रा’

ठाणे (प्रतिनिधी) : कला पर्यावरण संवर्धन शिक्षक आरती शर्मा यांचा मार्गदर्शनाखाली स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर तर्फे ठाण्यात ‘हॅलोवीन भुतांची जत्रा’ कार्यक्रम ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दु. २ ते ४ वा. विटावा, ठाणे येथे आयोजित करण्यात येत आहे.

देशांसोबत जगभरात विविध ठिकाणी "हॅलोवीन भुतांची जत्रा "हा दिवस अगदी खास आणि अनोख्या पद्धतीनं भूतांचा चित्रविचित्र पोशाख करून साजरा केला जातो. ध्वनी-जल-वायू-प्रदूषण व पर्यावरणाची कोणतेही हानी न करता बच्चे कंपनीसाठी धम्माल मस्तीसाठी ठाण्यात हॅलोवीन भुतांची जत्रा साजरी होणार आहे. अधिक माहितीसाठी ९३७२२२३६११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.