कल्याण पूर्वेतील गरोदर महिलांसाठी स्वास्थ्य शिबिर संपन्न

कल्याण पूर्वेतील गरोदर महिलांसाठी स्वास्थ्य शिबिर संपन्न

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्व  कोळसेवाडी विभागातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर इत्यादींच्या सहकार्याने या भागात आरोग्य तपासणी शिबिर व तसेच आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

यावेळी कोरोनाविषयक सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर तसेच मास्क इत्यादी सर्व नियम पाळण्यात आलेत. या शिबिरासाठी डॉ.सुषमा बसवंत यांना मार्गदर्शक म्हणून निमंत्रित आले होते. डॉ बसवंत मॅडम यांनी गरोदरपणामध्ये काय खावे काय खाऊ नये, काय करावे काय करू नये? तसेच समज गैरसमज, गरोदरपणामध्ये येणारे चंद्रग्रहण सूर्यग्रहण याबाबतच्या अंधश्रद्धा या विषयी वैज्ञानिक रित्या मार्गदर्शन केले तसेच मुलगा मुलगी भेद करू नये मुलगा-मुलगी समान मानावे. गरोदरपणात कोणते व्यायाम करावेत, कोणते करू नये, योगासने तसेच आहार व मानसिक स्वास्थ्य जपण्याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले उपस्थित होते. आहारातील प्रोटीन्सचे महत्त्व जाणून उपस्थित गरोदर महिलांना प्रोटीन पावडरचे डब्बे वाटप करण्यात आले. त्यांनी मनोगत व्यक्त करताना आशा स्वरूपाचे उपक्रम नेहमी घेत राहण्याची व अश्या पद्धतीने सामाजिक जनजागृती करण्याची गरज आहे.

उपस्थित गरोदर महिलांनी सुद्धा आम्ही यापूर्वी कधीही अशा पद्धतीचे गरोदर महिलांसाठीचे मार्गदर्शन शिबिर पाहिले नसल्याचे सांगितले. या शिबिरातून आमच्या मनातील अनेक शंका व समज-गैरसमज दूर झाल्याचे सांगितले. डॉ.बसवंत यांनी सुद्धा शिबिर आयोजित केल्याबद्दल सर्व विद्यार्थी समाज कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. या शिबिरासाठी अंगणवाडी सेविका प्रतिभा खोब्रागडे, रूपाली पाटील, प्रतिभा साळवे, ललिता आखाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका निकम यांनी केले तसेच येथील बैठक व्यवस्था व नियोजनामध्ये वि.स.का. ज्ञानेश्वर पालवी, करण परदेशी, पप्पू देसले, मानसी जधानव, प्रियांका गळवे, साधना खाडे, दीपाली कणसे, अनिता जाखेरे यांनी पाहिले व कार्यक्रमाचे आभार श्रीमंतराव आंबवडे यांनी मानले.