साथीचे आजार टाळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

साथीचे आजार टाळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

कल्याण (प्रतिनिधी) :
गेले काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अशा वातावरणात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कल्याण पूर्व येथील जाईबाई विद्या मंदिर शिवसेना शाखेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या काही मोजक्या भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. येथील वालधुनी नदीलगतच्या तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे रोगराईचे, साथीच्या आजारांचे प्रादुर्भाव वाढु नये म्हणून माजी महापौर तथा शिवसेनेचे जाईबाई विद्या मंदिर प्रभागातील स्थानिक नगरसेवक रमेश सुदाम जाधव यांनी प्रभागातील साईश्रद्धा सोसायटी, शिवकृपा चाळ, पवनदेव चाळ, वृंदावन सोसायटी अशा वालधुनी नदीलगतच्या परिसरात रोगराईचे, साथीच्या आजारांचे प्रादुर्भाव होऊ नये महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने साईनगर शिवसेना शाखा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. 

सदर शिबिरात सुमारे ४०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी लेप्टोस्पारीसीससारख्या गंभीर आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोफत औषधे देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपा साबळे आणि त्यांच्या पथकाने ही आरोग्य तपासणी केली. नगरसेविका रेखा रमेश जाधव यांनी त्यांचे याप्रसंगी आभार मानले. या शिबीराची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व ते यशस्वी करण्यासाठी शिवसेना शाखाप्रमुख उमेश परब, उपशाखाप्रमुख राम पावशे, कार्यालयप्रमुख मनोहर राणे, युवा सेना पदाधिकारी दत्ता पाखरे, जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी गावकर, गटप्रमुख प्रमोद परब, नंदकिशोर भोसले, शिवसेना महिला आघाडीच्या शारदा चव्हाण, कांचण हुमणे, पाखरे यांनी विशेष मेहनत घेतली.