मनविसेची सिग्नलवरील गरीब मुलांसोबत होळी 

मनविसेची सिग्नलवरील गरीब मुलांसोबत होळी 

ठाणे (प्रतिनिधी) : होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हंटले जाते. या पुरणपोळीची चव व रंगाचा आनंद सिग्नलवर राहणाऱ्या मुलांना देखील घेता यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या वतीने  तिन हाथ नाका येथील सिग्नलवरील गरीब मुलांना होळीचे रंग, पिचकारी, पुरण पोळी, मास्क देऊन होळी साजरी करण्यात आली.

मनविसेचे वतीने दरवर्षी गरीब मुलांसमवेत होळी साजरी केली जाते. होळीनिमित्त या लहानग्या मुलांना रंग, पिचकारी, पुरण पोळी मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहण्यास मिळाला. या प्रसंगी अंकिता सारंग, नीलम भोईर, काजल डावखर, पूनम सावंत, अंकिता सावंत, चिन्मयी सावंत, लश्मी चव्हाण, ईशीका सामंत, अश्विनी थोरात, इंदु, दिनेश मांडवकर, प्रितेश मोरे,  जितेश रायकर, तन्मय कोळी, सागर कदम, ओमकार महाडिक, प्रवीण बेलोसे, विरेश मयेकर, रुपेश साबळे, प्रणिल वाघमारे, अनिकेत चिरनरकर, आकाश चौधरी, रोशन वाडकर, अभिषेक देशमुख, साहिल चौधरी, नितेश जाधव, विघ्नेश कंटे, रोहन वाडकर, वीरेंद्र पवार, निरंजन रावराणे, सागर पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.