शिवसेनेच्या वतीने परिचारिकांच्या सेवेचा सन्मान

शिवसेनेच्या वतीने परिचारिकांच्या सेवेचा सन्मान

डोंबिवली (प्रतिनिधी) : कोरोना विरोधी लढ्यात अग्रभागी राहून लढणाऱ्या डोंबिवली शहरातील परिचारिकांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक व निस्वार्थी सेवेचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त डोंबिवली शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या हस्ते नुकताच सन्मान करीत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

डोंबिवली शहरातील दत्तनगर हेल्थ केंद्र, ज्ञानसाधना विद्यामंदिर लसीकरण केंद्र येथे शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी तेथील सर्व परिचारिकांचा शहर प्रमुख मोरे यांच्या हस्ते सन्मान करीत त्यांचा कार्याचे कौतुक करण्यात आले. डॉ. गावकर, सुनंदा सावंत, वैदही परब, रुपाली मोरे, ज्योती नवळी, वनिता कांबळे, वर्षा चव्हाण, प्राजक्ता तांबे, रोहिणी कांबळे, कुणाल पाटील व अन्य सर्व परिचरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख किरण पाटील, सागर जेधे, उपविभाग प्रमुख स्वप्नील वाणी, सागर इंगळे, महेश बुट्टे, कौस्तुभ फडके, कमलाकर सोहोनी, प्रमोद तुळस्कर, शशी सिंग आदी शिवसैनिक व सहकारी उपस्थित होते.