वृक्षारोपण कसे करावे ?

वृक्षारोपण कसे करावे ?

पावसाळा सुरु झाला आहे. प्रत्येकाला या पावसाळ्यात एक तरी झाड लावण्याची इच्छा असतेच. मात्र जे शहरात राहिलेले लोक आहेत, विशेषतः लहान मुलांना झाड कसे लावायचे याची योग्य माहिती नसते. कधी शाळेच्या पुस्तकात वृक्ष लागवडीचा गिरवलेला धडा विस्मरणातही गेलेला असतो. अशा वेळी पुन्हा एकदा प्रश्न पडतो की, झाडाची लागवड कशी करायची? याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कल्याण येथील प्राणवायू सामाजिक संस्थेचे विराज खैर यांनी याबाबत दिलेली माहिती पुढीलप्रमाणे:

चला यंदा किमान एक तरी झाड आपण प्रत्येकाने लावूया आणि हवामान बदला विरोधातील पृथ्वीचा म्हणजेच आपला लढा सुरु ठेवूया!

रोप लावताना खालील गोष्टी कटाक्षाने पाळा म्हणजे रोप जोमाने वाढण्यास अधिक मदत होईल.


• ६० से.मी. x ६० से.मी. x ६० से.मी. या आकाराचा खड्डा करा. या खड्यातील सर्व माती व दगडगोटे बाजूला वेगवेगळी काढा.
• प्लास्टिकच्या पिशवीतील रोपांच्या मुळांच्या उंची एवढा खड्डा मोकळा ठेवून खालील भाग ५०% गाळाची माती व ५०% शेणखताने भरून घ्या.
•  ५ से.मी. वर गोलाकार बुडाचे घेर कापावा. नंतर उभे कापावे.
•  प्लास्टिकच्या पिशवीतील रोपे पिशवी काढून आतील मातीसह अशाप्रकारे धरावे की, जेणेकरून रोपांची कॉलर जमिनीच्या पातळीत येईल. संपूर्ण मूळ सरळ राहील, दुमडले जाणार नाही. रोपे सकाळी किंवा संद्याकाळी लावा, ऐन  दुपारच्या वेळी लावू नका.
•  रोपे लावून खड्यात पूर्ण माती भरून सपाट करा व हलक्या हाताने माती दाबून पाणी घाला.
• माती व दगडाने आळे करा ( साधारणत २ फुट व्यासाचे- उताराच्या जमिनीसाठी खालील बाजूस अर्धवर्तुळाकार तर सपाट जमिनीसाठी पूर्ण वर्तुळाकार आळे करावे म्हणजे पावसाचे पाणी रोपाला सहजपणे मिळेल.

----------------------------------------------------------------------------
संकलन : विराज खैर, टिटवाळा.
------------------------------#सौजन्य #----------------------------------
प्राणवायू सामाजिक संस्था
Whatsapp : ९२७०३४९१११
Visit Our Facebook Page : https://www.facebook.com/Pranwayu-Samajik-Sanstha-Kalyan-102690898143901