ठाण्यातील हुतामाकी पीपीएलच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

ठाण्यातील हुतामाकी पीपीएलच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

ठाणे (प्रतिनिधी) : 
एकीकडे जागतिक मंदी असतांना ठाण्यातील माजिवाडा नाका येथील हुतामाकी पी.पी.एल. कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार आज वागळे इस्टेट येथील कामगार आयुक्त कार्यालयात करण्यात आला. या करारामुळे कामगारवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कामगार आयुक्त कार्यालयात कामगार उपायुक्त डोके यांच्या उपस्थितीत हुतामाकी पी.पी.एल.कंपनीच्या वतीने असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट सुहेल परेरा, प्लॅन्ट हेड स्वप्ना देशमुख तर मजदूर काँग्रेस युनियनचे जनरल सेकेटरी परशुराम कोपरकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

हुतामाकी पी.पी.एल. कंपनीत गेल्या ४५ वर्षांपासून मजदूर काँग्रेस युनियन कार्यरत आहे. तेव्हापासून कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता युनियन कंपनी प्रशासनाशी यशस्वीरित्या करार करत आली आहे. युनियनचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच जनरल सेकेटरी परशुराम कोपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हुतामाकी पी.पी.एल.च्या व्यवस्थापनाशी वेतनवाढीचा गुरुवारी यशस्वी करार करण्यात आला.

सदरच्या करारामुळे कामगारांच्या मासिक पगारात सरासरी ६३०० रुपयांची वाढ होणार आहे. सेवाकालाप्रमाणे प्रत्यक्ष पगारवाढ ५१५० रुपयांपासुन ६६४४ रुपयांपर्यंत, पगारवाढी व्यतिरिक्त अप्रत्यक्ष वाढीमध्ये सरासरी ७८७ रुपयांचा पॅकेज, सरासरी वाढीपैकी व ५० टक्के रक्कम डी.ए. बेसिकमध्ये ५० टक्के रक्कम अलाउन्समध्ये, वेतनश्रेण्यांचे मुल्य वाढवुन इंक्रिमेंटमध्ये १० ते १५ रुपयांपर्यंत वाढ (कमी बेसिकमध्ये मोठी इंक्रिमेंट), अतिरिक्त ग्रॅज्युइटी ७० हजार रुपये, करारामुळे ग्रॅज्युइटी रकमेमध्ये ६५ हजार रुपयांपर्यंत वाढ (निवृत्त होणाऱया कामगारांस), कामगारांना फॅमिली मेडीकल बेनेफीट पॅकेज वार्षिक ८ हजार रुपये, २ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी हौसिंग लोन, करारामुळे कामगारांचा सरासरी पगार ४३ हजार २०० रुपये मिळणार आहे. कराराची मुदत १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ मार्च २०२२ अशी आहे. कामगारांना थकबाकीपोटी ९७ लाख रुपयांचे वाटप  २० सप्टेंबर २०१९पर्यंत करण्यात येणार आहे.