मी शिवसैनिक पुरस्कृत उमेदवार - धनजंय बोडारे

मी शिवसैनिक पुरस्कृत उमेदवार - धनजंय बोडारे

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याण पूर्व विधानसभेच्या विद्यमान आमदारांनी कोणतीही विकासकामे केली नसल्याने या आमदारांच्या विरोधात आम्ही बंड पुकारले आहे. मात्र ही आमची बंडखोरी नाही तर मी शिवसैनिक पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात असल्याचा दावा कल्याण पूर्वचे अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

येत्या सोमवारी विधानसभा निवडणूकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण केलेल्या प्रचाराचा आढावा देण्यासाठी अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांनी शुक्रवारी सायंकाळी प्रभाग ‘ड’ कार्यालयाजवळील प्रचार कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष नेतृत्वाकडे पूर्वेतील नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी राजीनामे दिल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच प्रचार चालु केल्यापासुन आजपर्यंत नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर कल्याण पूर्व मतदारसंघाचा विकास करण्यासाठी व्हिजन तयार केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

यावेळी बोडारे यांच्या नियोजित कामाचा वचननामाही प्रकाशित करण्यात आला. या पत्रकार परिषदेस हर्षवर्धन पालांडे, कार्यालय प्रमुख रमाकांत देवळेकर,  नगरसेवक महेश गायकवाड, माजी नगरसेवक शरद पाटील,  राजेश दाखीनकर, चंद्रकांत बोराडे आदी  उपस्थित होते.