स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे देशात चौदावे तर राज्यात तिसरे

स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे देशात चौदावे तर राज्यात तिसरे

ठाणे (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या वतीने सन २०२१ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्रमांकवर तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचा क्रमांक राखण्यात शहराला यश आले आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. सन २०२१ रोजी कच-याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आणि निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते.

या सर्वेक्षणामध्ये सन २०२० ला  ठाणे शहराने ५७ व्या क्रमांकावरून देशात १४  व्या क्रमांकावर आघाडी घेतली होती. तर सन २०२१ ला हाच क्रमांक राखण्यात यश आले आहे,  तर राज्यात ठाणे शहराने ३ रा क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन टीमचे अभिनंदंन केले आहे.