डोंबिवली येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे मंगळवारी उद्घाटन

डोंबिवली येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे मंगळवारी उद्घाटन

डोंबिवली (प्रतिनिधी) : भारतीय टपाल विभाग आणि विदेश मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करारानुसार मंगळवार, दि. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी डोंबिवली इन्डस्ट्रीअल एरिया या टपाल कार्यालय येथे टपाल घर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन होत आहे. 

सदर पासपोर्ट सेवा केंद्रामुळे स्थानिक रहिवाशी तसेच जवळपासच्या शहरातील लोकांना या पासपोर्ट संबंधी सेवांचा लाभ घेता येईल. या पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन १२ ऑक्टोबर २०२१ रोजी केंद्रीय संचार राज्य मंत्री देवु सिंह चौहान यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता होईल. या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच एच. सी. अगरवाल, मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र पोस्टल सर्कल, डॉ. राजेश गवांडे, प्रादेशिक पारपत्र अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.