मराठा सेवा संघाच्या ठाणे शहर कार्यालयाचे उद्घाटन

मराठा सेवा संघाच्या ठाणे शहर कार्यालयाचे उद्घाटन
मराठा सेवा संघाच्या ठाणे शहर कार्यालयाचे उद्घाटन

कल्याण (प्रतिनिधी) :

शिवराज्यभिषेक दिनाचे औचीत्य साधून मराठा सेवा संघाच्या ठाणे शहर कार्यालयाचे उदघाटन मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता नवनाथ घाडगे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला मूख्य अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, माजी खासदार आनंद परांजपे, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास पवार, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक संजय वाघूले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण परब, मराठा सेवा संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नितिन मोकाशी, जिजाऊ ब्रिगेड कोकण विभागीय अध्यक्ष विद्या गडाख, समाजसेवक रमाकांत पाटील, रविंद्र मोरे, हेमंत पमनानी, प्रभाकर सावंत, भगवान ढेगंळे, मनोहर चव्हाण, नितिन पाटील, राजेश गाडे, आगरी कोळी गीतांचा बादशहा जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी संघाच्या ठाणे शहर कार्यालयाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित असलेले मुख्य वक्ते नवनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे ठाणे शहर अध्यक्ष संतोष मोरे आणि ठाणे शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.