गणपती विसर्जनासाठी मोहोने ग्रामस्थ मंडळाच्या सूचना 

गणपती विसर्जनासाठी मोहोने ग्रामस्थ मंडळाच्या सूचना 

आंबिवली (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी श्रीगणपती व गौरी विसर्जन करण्यासंदर्भात  स्थानिक प्रशासन उपाययोजना करीत असतानाच मोहोने येथील ग्रामस्थ मंडळाने देखील विसर्जनाकरीता मार्गदर्शक सुचना जारी केल्या असून सर्व ग्रामस्थ व व परिसरातील नागरिकांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुभाष गंगाराम पाटील यांनी केले आहे.

कोळीवाड्यातील ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी, तसेच गणेशोत्सव मंडळांनी देखील श्रीगणपती व गौरीच्या मुर्तीसह विसर्जनासाठी श्रीवैकुंठेश्वर महादेव मंदिर, गणेश घाट, मोहोने येथे पोहोचावे. मंडळांनी विसर्जनासाठी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, मंडळांनी विसर्जन वेळेवर होईल याची काळजी घ्यावी, ताप, खोकला, सर्दी इत्यादी आजार असणाऱ्या नागरिकांनी विसर्जनासाठी  गणेशघाट येथे येण्याचे टाळावे, मास्क असल्याशिवाय कुणीही गणेश घाटावर येण्याचा प्रयत्न करु नये, गणेशघाट येथे शक्यतो आरती करण्याचे टाळा- घरूनच आरती करून निघावे, आदी सूचना मंडळाने दिल्या आहेत.

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन व्हायला हवे म्हणून ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणारी विसर्जन मिरवणूक यंदा काढण्यात येणार नसल्याची माहिती मंडळाचे सरचिटणीस रमेश कोनकर यांनी दिली असून स्थानिक प्रशासन व मोहोने ग्रामस्थ मंडळाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असल्याचे ते म्हणाले.