वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी जय भोसले

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी जय भोसले

नवी मुंबई (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी जय भोसले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भास्कर निर्मळ यांच्या सुचनेनुसार आणि मराठा सेवा संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन मोकाशी, ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे, संभाजी ब्रिगेड नवी जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत भोसले, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जय भोसले यांची नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर जय भोसले यांनी, आपण संघटनेच्या संहितेनुसार विद्यार्थ्यांच्या न्याय-हक्कासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून कार्य करू, असा निर्धार  व्यक्त केला आहे.