संभाजी ब्रिगेडचे जव्हार तालुका पदाधिकारी जाहीर

संभाजी ब्रिगेडचे जव्हार तालुका पदाधिकारी जाहीर

जव्हार (प्रतिनिधी) : पालघर  नुकतेच जव्हार येथे  संभाजी ब्रिगेड पक्षाचा पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पालघर जिल्हाध्यक्ष तेजस भोईर यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडला. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

यावेळी लोकसभा अध्यक्ष संजय पाटील, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विश्वास पाटील, प्रवक्ते भगवान पाटील, विक्रमगड तालुकाध्यक्ष प्रकाश भोये, कामगार आघाडी वाडा तालुकाध्यक्ष संजय जाधव, विक्रमगड तालुका प्रसिद्धीप्रमुख अजय लहारे, संघटक दिपक सापटा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी संभाजी ब्रिगेड जव्हार तालुका अध्यक्षपदी समीर कोतवाल, उपाध्यक्ष भास्कर गायकवाड, सचिव मच्छिंद्र निरवडे, कार्याध्यक्ष नंदू मांगात, संघटक विजय दुधेडा, संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीच्या जव्हार तालुकाध्यक्ष दत्तु फत्तेसिंग गावित, खजिनदार कमलेश शिवराम पगार, सचिव सचिन संतोष भामरे, तसेच संभाजी ब्रिगेड जव्हार शहर उपाध्यक्षपदी मनोज वातास, सचिव अतुल कनोजा, सहसचिव बाळकृष्ण

तिवारी, तर संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी रोहीत बरफ, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी संदीप कोरडा, उपाध्यक्ष तुषार मोरघा, संघटक प्रदिप काकड, कामगार आघाडीच्या जव्हार शहर उपाध्यक्ष रामकृष्ण तिवारी, सचिव ऋषिकेश हरपले, सहसचिव अतुल गावित, संघटक आदील जाफर शेख यांची निवड यावेळी घोषित करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन भामरे यांनी केले.