मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करण्याची जिजाऊ ब्रिगेडची मागणी

मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करण्याची जिजाऊ ब्रिगेडची मागणी

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व मंदिराचे राष्ट्रीयीकरण करून तेथील संपत्ती सरकारी तिजोरीत जमा करावी, अशी मागणी शुक्रवारी जिजाऊ ब्रिगेडच्या ठाणे जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या गडाख, जिल्हाध्यक्षा प्रा. एकता देशमुख, जिल्हा कार्याध्यक्षा ममता मसुरकर, शहराध्यक्षा प्रतिभा शिर्के, विशाखा राऊत आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थित त्यांच्या प्रतिनिधींकडे निवेदन सादर केले.

राज्यात श्री अंबाबाई मंदिर कोल्हापूर येथील भ्रष्ट पुजारी आणि व्यवस्थापन बदलण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. श्री अंबाबाई देवस्थानात अनेक भाविक दागिने, साड्या व रोख रक्कम स्वरूपातील देणगी यांच्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असून भ्रष्टाचार होत असल्याने तेथील व्यवस्थापनावर आणि पुजाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून नवीन व्यवस्थापनाची नेमणूक करावी. तसेच पुरुष पुजारी बदलून तात्काळ महिला पुजाऱ्यांची नेमणूक करावी. याच सोबत राज्यातील सर्व मंदिराचे राष्ट्रीयीकरण करून तेथील संपत्ती सरकारी तिजोरीत जमा करावी, अशी मागणी शुक्रवारी ठाणे जिजाऊ ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने  जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.