कल्याणमध्ये नोकरी महोत्सवात तीन हजार युवकांना जॉब कार्ड वितरीत

 कल्याणमध्ये नोकरी महोत्सवात तीन हजार युवकांना जॉब कार्ड वितरीत

कल्याण (आर.टी. सुरडकर) : 
कल्याण पूर्वेत नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवात तीन हजार तरुण तरुणींना जॉब कार्ड वाटप करण्यात आले. या मेळाव्यास पाच हजार नोकरी इच्छुक तरुण तरुणींनी भेट दिली. या नोकरी महोत्सवाचे आयोजन कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले होते.

विविध क्षेत्रात अनेक जॉब असताना युवकांना मार्गदर्शन नसल्याने युवक नोकरीसाठी भटकंती करीत असतात. या बेरोजगार युवक युवतींना नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कल्याण पूर्वचे आ. गायकवाड यांनी पुढाकार घेत या नोकरी महोत्सवाचे आयोजन कल्याण पूर्वेच्या कर्पे हॉल येथे केले होते. त्यात मोठ्या प्रमाणात युवक युवतींनी सहभाग घेतला.

सदर नोकरी महोत्सव पाचवी ते पदवीधर अशा सर्वांसाठी खुला होता. यात एमबीए, डिप्लोमा,  आयटीआय, तसेच अंतिम परीक्षेस बसणाऱ्या युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. या नोकरी मेळाव्यात भाग घेतलेल्या युवक युवतींना मिळालेल्या जॉबकार्डवर बॅंकिंग, हॉटेल, फाईनेन्स, रियल इस्टेट, मॅनेजमेंट, इन्शुरन्स, रिटेल, हॉस्पिटल, ऑटोमोबाईल, मँन्यूफेचरिंग आदी क्षेत्रातील जॉब मिळणार आहेत. हे जॉबकार्ड मिळाल्याना त्याचे नाव रजिस्टर करण्यात आल्यावर नोकरी निमित्त रोज मोबाइल वर मेसेज येणार आहेत. या नोकरी महोत्सवात प्रमुख संस्थाचे प्रशिक्षण मिळाले होते. यात एल. अँड टी. कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिग प्रोग्राम, महेंद्रा प्राईड, टाटा सर्व्हिस स्किल डेव्हलपमेंट सेंटर आदीचा समावेश होता.