कल्याण: निळकंठ सृष्टी येथील जलवाहिनीचे आ. भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण: निळकंठ सृष्टी येथील जलवाहिनीचे आ. भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण (प्रतिनिधी) : अनेक महिन्यांपासून उंबर्डे येथील निळकंठ सृष्टी परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासत होती. पाण्याचा दाब कमी असल्या कारणामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते, ही बाब लक्षात घेऊन येथे आमदार निधीतून जलवाहिनीच्या कामाचे तसेच मंगेशीनगर ते भागीरथीनगरपर्यंतच्या रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी करण्यात आले.

स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून माजी नगरसेवक जयवंत भोईर यांच्या अथक प्रयत्नांनी निळकंठ सृष्टी गृहसंकुलात करिता दशलक्ष निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच प्रभूनाथ भोईर यांच्या प्रयत्नाने मंगेशीनगर ते भागीरथीनगरपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या दोन्ही कामाचे भूमिपूजन स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह प्रभागातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. 

कल्याणमधील नागरिकांच्या काही समस्या आहेत यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून पूर्ण करणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, वैशाली भोईर, पुष्पा भोईर, चंद्रबाई कारभारी, परिवहन सदस्य सुनील खारीक यांच्यासह निळकंठ सृष्टी परिसर आणि भागीरथीनगरमधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.