कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी कल्याणमध्ये भाजपतर्फे जल्लोष

कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी कल्याणमध्ये भाजपतर्फे जल्लोष

कल्याण (प्रतिनिधी) : भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने ठाणे जिल्हयातील भूमिपुत्र असल्याने सर्वत्र जल्लोष करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथेही बुधवारी सांयकाळी भाजप कल्याण शहरचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे नेतृत्वाखाली घोषणाबाजी करीत, पेढे वाटत जल्लोष करण्यात आला. यावेळी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकत्ये उपस्थित होते.

कल्याण-भिवंडी भागाचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळ मध्ये वर्णी लागल्याने त्यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र मंत्री होणार असल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. कल्याण येथेही कल्याण शहर भाजपचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खडकपाडा चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले. पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राजा पातकर, माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे, वैशाली पाटील, डॉ. शुभा पाध्ये, पुष्पा रत्नपारखी, माजी शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे, महेंद्र मिरजकर, श्याम मिरकुटे आदींसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.